Scene of the accident near SNDT College, Santacruz where a pedestrian lost his life after being hit by a speeding bike. Saam Tv
Video

Mumbai News: मुंबईच्या सांताक्रुझमध्ये अपघाताचा थरार; भरधाव बाईकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, VIDEO

Fatal Pedestrian Accident Near SNDT College: सांताक्रुझ पश्चिम एसएनडीटी कॉलेजसमोर भरधाव बाईकने रस्ता ओलांडणाऱ्या गणेश शाह यांना जोरदार धडक दिली. अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी बाईकस्वाराला अटक केली आहे.

Omkar Sonawane

मुंबई – सांताक्रुझ पश्चिम येथील एसएनडीटी कॉलेजसमोर एक दुर्दैवी अपघात घडला असून, भरधाव बाईकने दिलेल्या जोरदार धडकेत एक पायी चालणारा जागीच ठार झाला आहे. मृत व्यक्तीची ओळख गणेश लखन शाह (वय 39) अशी झाली असून, ते रस्ता क्रॉस करत असताना हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या बाईकने त्यांना जबर धडक दिली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत बाईकस्वार आरोपी किनन मिसकिटा (वय 21) याला जुहू कोळीवाडा परिसरातून अटक करण्यात आली आहे. किनन मिसकिटा हा जुहू कोळीवाडा परिसरात वास्तव्यास असून, अपघात नेमका कशामुळे घडला, याचा तपास सांताक्रुझ पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

Hair Growth: हेल्दी, जाड अन् सिल्की केसांसाठी जास्वंदाचे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

SCROLL FOR NEXT