Mumbai Rain Video 
Video

Mumbai Rain Video : पावसामुळे मुंबईची तुंबई! गांधी मार्केटमध्ये गुडघाभर पाणी, नागरिकांची ताराबंळ, व्हिडिओ पाहा

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे गांधी मार्केट परिसरात गुडघाभर पाणी साचले असून वाहनचालक आणि पादचारी त्रस्त झाले आहेत. दुकानदारांनी पाण्यामुळे मालाचे नुकसान झाल्याची तक्रार केली आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Rain Gandhi Market News : मुंबईत सलग चौथ्या दिवशी पाऊस झोडपतोय. रात्री गांधी मार्केट परिसरात पावसामुळे पाणी भरलं होतं. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत होता.

मुंबईत सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने शहराला झोडपले आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेलया पावसामुळे गांधी मार्केट परिसरात रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पाण्यातून मार्ग काढताना अनेकांना कसरत करावी लागली.

गांधी मार्केट परिसरातील दुकानदारांनी पाण्यामुळे मालाचे नुकसान झाल्याची तक्रार केली आहे. पावसामुळे वाहतूक कोंडीतही मोठी वाढ झाली, तर काही ठिकाणी रस्ते बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. पालिकेच्या आपत्कालीन पथकांनी पाणी उपसण्याचे काम सुरू केले असले, तरी पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याने पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT