Mumbai Rain News Update Saam Tv
Video

Mumbai Rain: मुंबईसाठी पुढचे ३ तास महत्वाचे, मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

Mumbai Rain News Update: मुंबईकरांसाठी पुढचे काही तास महत्वाचे असणार आहे. मुंबईत पुढच्या ३ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Priya More

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे असणार आहे. पुढच्या ३ तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला.

रायगड आणि रत्नागिरी येथील घाट क्षेत्रात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्र मान्सूनने व्यापला गेला आहे. दरम्यान,राज्यात तीन ते चार दिवसांत मान्सून सक्रिय होणार आहे. मान्सूनच्या वाऱ्याबरोबर आद्रतेचे प्रमाण वाढले आणि भागात पाऊस झालेला दिसून येतो . मान्सून राज्यातल्या अनेक भागात पोहोचला. येणाऱ्या काळात मान्सूनची परिस्थिती चांगली असणार आहे. कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.घाटमाथ्यावरील पावसाची परिस्थिती चांगली असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT