Mumbai-Pune Expressway Saam Tv
Video

Mumbai-Pune Expressway: लोणावळा घाटात ३ तासांपासून मोठी वाहतूक कोंडी, एक्स्प्रेस वेवरील प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai-Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला पावसाचा मोठा फटका बसला. या पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Priya More

पुणे जिल्ह्यात कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळली. मुंबईवरून पुण्याकडे आणि पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रवाशांना गेल्या ३ ते ४ तासांपासून महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अशामध्ये मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांनी प्रवास टाळावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून जात आहे.

दरम्यान, दरड कोसळणे आणि सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एकाच ठिकाणी बरेच तास अडकून राहिल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. पुणे- मुंबई तसेच मुंबई- पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे- मुंबई किंवा मुंबई- पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT