Mumbai Pune Express Highway Traffic News Saam TV Marathi News
Video

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीची दिवाळी, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Mumbai-Pune Expressway Traffic Jam : पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. दिवाळीसाठी घरी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहतूककोंडी झाली आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Pune Express Highway Traffic News : दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. उत्साही प्रवाशांमुळे आणि सणासुदीच्या गतीमुळे रस्त्यावर गती मंदावली असून, पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केल्या आहेत.

पुण्यातून दिवाळीसाठी गावी निघालेल्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे शहरातून बाहेर पडण्यासाठी अहिल्यानगर, नाशिक, सातारा, सोलापूर हे महामार्ग आहेत. या महामार्गावर कालपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. खाजगी गाड्या ट्रॅव्हल्स यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचं दोन दिवसापासून पाहायला मिळते. उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचबरोबर रस्त्यामध्ये मोठे खड्डे आणि रस्ते खराब असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पुण्यातून पहाटे पाच वाजता संभाजीनगर साठी निघालेल्या प्रवाशांना विमान नगर पासून ते रांजणगाव पर्यंत 60 किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी साडेतीन तास लागले आहेत. मोठ्या प्रमाणावर ती जड वाहतूक या मार्गावरती आहे रस्ते खराब झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT