Long queues of vehicles seen on the Mumbai–Pune Expressway near Khandala Tunnel due to heavy traffic congestion. Saam Tv
Video

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा|VIDEO

Mumbai Pune Expressway Traffic Jam Today: मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशीही प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. खंडाळा टनल परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Omkar Sonawane

मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून 15-15 मिनिटांचे ब्लॉक घेण्यात येत आहेत. या अंतर्गत पुण्याकडून मुंबईकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा टनलजवळ थांबवली जात असून, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने दत्तवाडी–खंडाळा येथून विरुद्ध दिशेने सोडली जात आहेत.

या उपाययोजनेमुळे काही प्रमाणात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळत असला, तरी मुंबईकडे जाणारी वाहने खंडाळा टनलजवळ थांबवल्याने एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात विलंबाचा सामना करावा लागत आहे.

महामार्गावरील खंडाळा टनल, बोरघाट चौकी, दत्तवाडी, अंडा पॉईंट आणि खोपोली एक्झिट या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलीस सतत कार्यरत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, वाहनचालकांनी संयम राखावा आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT