मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. बोरघाटातील आडोशी बोगद्याच्या छताचा काही भाग कोसळला आहे. बोगद्यातून वाहने जात होती. यातील धावत्या वाहनांवर बोगद्याचे छत कोसळले आहे. सुदैवाने, वाहनांचा वेग मर्यादित असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र,दोन वाहनांचे नुकसान झालं आहे. या घटनेमुळे हायवेवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्यंतरी बोगद्याच्या बाहेर अपघात झाल्याने जवळपास ३२ तास वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अपघाताची घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.