Maharashtra Police Video Saam Tv
Video

Mumbai Police Video: स्वप्नपूर्ती! पोलिस होताच पहिली सलामी वनरक्षक अधिकारी भावाला, घट्ट मिठी मारली अन् उचलून घेतलं; काळजाला भिडणारा VIDEO

Mumbai Police Brother Emotional Viral Video: सध्या सोशल मीडियावर दोन भावांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लहान भाऊ पोलिस झाला हे पाहून मोठ्या भावाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

Siddhi Hande

मोठा भाऊ वनरक्षक अधिकारी तर दुसरा झाला पोलिस

भावाला वर्दीत पाहताच अश्रू अनावर

भावनिक व्हिडिओ व्हायरल

पोलिस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. स्वप्न पूर्ण केल्यानंतर जो काही आनंद असतो तो शब्दात सांगता येणारा नसतो. त्याचसोबत कुटुंबियांचाही उर भरुन येतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आपला भाऊ पोलिस झाल्यानंतर मोठ्या भावाला अश्रू अनावर झाले आहे. हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भाऊ पोलिस झाला, मोठ्या भावाला अश्रू अनावर (Maharashtra Police Brother Emotional Video)

मुंबई पोलीस दलात भरती झालेल्या भावाला समोर पाहताच वनरक्षक अधिकारी भाऊ क्षणभर स्तब्ध झाला. डोळ्यांत दाटून आलेले अश्रू त्याच्या कष्टांची, संघर्षाची आणि स्वप्नांच्या पूर्ततेची साक्ष देत होते. ज्याच्यासाठी अनेक रात्री जागून प्रार्थना केली, तो भाऊ आज अभिमानाने पोलीस गणवेशात उभा होता.त्या क्षणी शब्द अपुरे पडले आणि भावना बोलू लागल्या. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली. ही मिठी केवळ भेट नव्हती, तर ती प्रेमाची, त्यागाची आणि जिद्दीच्या विजयाची निशाणी होती. उपस्थितांचेही डोळे नकळत पाणावले. हा क्षण प्रत्येकाच्या मनात घर करून गेला.

व्हायरल व्हिडिओत दोन भावांमधील प्रेम दिसत आहे. लहान भाऊ पोलिस झाला म्हणून मोठ्या भावाला खूप अभिमान वाटला. लहान भावाने आपल्या भावाला सलामी दिली. पोलिस झाल्यानंतरचा पहिला सलाम आपल्या भावाला केला. त्यांचा हा व्हिडिओ खूपच मनाला भिडणारा आहे. मोठा भाऊ वनरक्षक आणि लहान भाऊ पोलिस अधिकारी झाला आहे. या दोघांचाही संघर्ष त्याच्या डोळ्यातील अश्रूतून कळत आहे. पोलिस झालेल्या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला उचलून घेत आपला आनंद साजरा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Elephanta Caves : 'घारापुरी' लेणीला 'एलिफंटा' हे नाव कसं पडलं? कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

उंची कमी असल्यास कपड्यांची निवड कशी करावी? जाणून घ्या 5 स्मार्ट स्टायलिंग टिप्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मूळ वेतनात होणार ५१००० रुपयांची वाढ? कसं असेल कॅलक्युलेशन?

SCROLL FOR NEXT