Mumbai Metro Saam Tv
Video

Mumbai Metro: मेट्रो 3 स्टेशन पाण्यात! वरळी, BKC मध्ये गळती थांबेना; पाहा VIDEO

Mumbai Metro 3: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मेट्रोला फटका बसला आहे. मेट्रो ३ वरील स्टेशनवर पावसाचे पाणी गेलं आहे. वरळी, बीकेसी मेट्रो स्थानकावर पाण्याची गळती सुरू आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पातील बीकेसी आणि वरळी स्थानकांमध्ये गळतीचं संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाणी साचल्याच्या घटनेनंतर आता बीकेसी मेट्रो स्थानकात भिंतींना ओलावा, छतातून पाणी गळती असे दृश्य दिसून येत आहेत. याआधी गळती रोखण्यासाठी एमएमआरसीने पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. आता गळतीच्या ठिकाणी कर्मचारी सातत्यानं पाणी पुसताना दिसत आहेत. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर फोटो शेअर करत टीका केली आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावासाचा फटका आता मुंबईकरांना बसत आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा २० ते २५ मिनिटं उशिराने सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहे. आज मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT