Mumbai Mayor post Race saam tv
Video

Mumbai Mayor Race : मुंबईच्या महापौरपदासाठी शर्यत वाढली, या ६ महिलांची नावं चर्चेत

mumbai mayor race women candidates : मुंबईच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता या पदासाठी शर्यत वाढली आहे. ६ जणांची नावे चर्चेत आहेत.

Nandkumar Joshi

मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे आणि भाजप, शिंदेंसाठी प्रतिष्ठेची झाली होती. मुंबईकरांनी भाजप-शिंदेसेना युतीच्या बाजूने कौल दिला. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यांचे ८९ उमेदवार जिंकले. मुंबईचा महापौर कोण होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात शिंदेसेनेनं अडीच वर्षांसाठी महापौरपद देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यात महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. महापौरपद खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळं मुंबईच्या महापौरपदी महिला विराजमान होणार हे निश्चित झालं आहे.

महापौरपदासाठी ६ महिला नगरसेवकांची नावं आघाडीवर आहेत. राजश्री शिरवडकर, अलका केरकर, रितू तावडे, हर्षिता नार्वेकरांची नावं चर्चेत आहेत. शीतल गंभीर आणि आशा मराठे या दोघींची नावेही आघाडीवर आहेत. शिरवडकर आणि केरकर या दोन्ही नवनिर्वाचित नगरसेविका या पदासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येते. आता भाजपचे वरिष्ठ नेते कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांना शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर का लावायचा असतो?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये किरकोळ कारणांवरून तरुणाला अमानुष मारहाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! सांगलीत आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

दिवसाढवळ्या थरार! ५ जणांनी पाठलाग केला, रस्त्यात गाठून २५ वर्षीय तरुणाला क्रूरपणे संपवलं, हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik Mayor Race : अनुभवी विरुद्ध निष्ठावान; कोण होणार नाशिकचा महापौर? ४ महिलांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT