Firefighters battle massive blaze on the 12th floor of Vaishnav Heights, Malad, Mumbai. Saam Tv
Video

Mumbai Building Fire: आकाशात धुरांचे लोट,आगीचं विक्राळ रुप, मालाडमधील उच्चभ्रु इमारतीच्या १२ व्या मजल्याला भीषण आग|VIDEO

Mumbai Malad East: मालाड पूर्वेतील वैष्णव हाइट्स इमारतीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग लागली. आग लेव्हल-२ घोषित करण्यात आली असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Omkar Sonawane

मालाड पूर्वेतील वैष्णव हाइट्सच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग लागली.

दुपारी ३.४९ वाजता आगीला लेव्हल-२ घोषित करण्यात आले.

अग्निशमन दलाने सात फायर इंजिन्ससह मोठा ताफा घटनास्थळी पाठवला.

आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र धूर बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

मुंबई: येथील मालाड पूर्वेतील राणी सती मार्गावर बालाजी हॉस्पिटलसमोर असलेल्या वैष्णव हाइट्स इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आज दुपारी भीषण आग लागली. सुरुवातीला ही आग ११ व्या मजल्यावरील बंद खोलीत लागली होती. दुपारी ३.४९ वाजता तिला लेव्हल-२ घोषित करण्यात आले. त्यानंतर आग १२ व्या मजल्यावरील सुमारे ६०० चौ.फुट क्षेत्र पसरत गेली आणि वरच्या मजल्यांवर प्रचंड धुराचे लोट पसरले. या आगीमुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेपासून स्थानकापर्यंतचा रस्ता पूर्णपणे बंद झाला असून घटनेचे भयावह दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जात आग विझवण्याचे प्रयत्न केले. विभागीय अग्निशमन अधिकारी, अतिरिक्त DFO, वरिष्ठ स्टेशन अधिकारी आणि स्टेशन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सात फायर इंजिन्स, एक टर्नटेबल लॅडर, हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, दोन एरियल वॉटर टेंडर, चार जेट टेंडर, एक ब्रीदिंग अॅपरेटस व्हॅन आणि एक क्विक रिस्पॉन्स व्हेईकल घटनास्थळी दाखल झाले.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आग आटोक्यात आणली असून वरच्या मजल्यांवरील धूर बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजितदादांना भरसभेत ‘I Love You’ म्हणणारा कार्यकर्ता ढसाढसा रडला; म्हणाला, दादांना मेसेज पाठवला अन्...VIDEO

Shocking: हादरवणारं दृश्य, नवरा-बायकोचे मृतदेह बेडरूममध्ये, ३ मुलं...त्या भयाण रात्री घरात नेमकं काय घडलं?

Wedding Hair Style: लग्नसराईसाठी साडीवर या ५ सुंदर आणि ट्रेंडिंग हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

Evening Yoga Tips : योगा संध्याकाळी करावा की नाही?

Maharashtra Live News Update : अजित पवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत २ राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी माझ्याकडे आग्रह केला - अंकुश काकडे

SCROLL FOR NEXT