Central Railway tests a new door design in Mumbai local trains to prevent dangerous hanging travel and improve passenger safety. Saam Tv
Video

लोकलमधील धोकादायक प्रवास आता इतिहासजमा होणार; रेल्वे प्रशासनाची अनोखी शक्कल|VIDEO

Mumbai Local Train Door Hanging Safety Solution: मुंबई लोकलमधील दरवाजावर लटकून होणारा धोकादायक प्रवास थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने अनोखी शक्कल लढवली आहे. नव्या दरवाजा रचनेमुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Omkar Sonawane

मुंबईकरांच्या जीवाशी खेळणारा लोकलमधील धोकादायक प्रवास आता इतिहासजमा होणार असल्याची शक्यता आहे.मध्य रेल्वेवर दररोज लाखो प्रवासी लोकलच्या दरवाजावर लटकून प्रवास करताना दिसतात. मात्र या प्रवासामुळे अनेकदा अपघात होऊन जीवितहानीही होते. अलीकडेच मुंब्रा–दिवा दरम्यान झालेल्या भीषण अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत. लोकलच्या दरवाजावरील पन्हाळीचा पारंपरिक आकार बदलून आता धनुष्यबाणासारखा आकार देण्यात येणार आहे.

या नव्या रचनेमुळे प्रवाशांना दरवाजाला धरून लटकणे शक्य होणार नाही असा दावा रेल्वे प्रशासनाचा आहे. सध्या कुर्ला कारशेडमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या बदलांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास लवकरच मध्य रेल्वेवरील सर्व लोकलमध्ये ही नवीन सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा दरवाजावर लटकून होणारा प्रवास थांबेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र ही योजना प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालघरची भाषा मराठी की गुजराती? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO

राजकीय भूकंप होणार? पुढील ८ दिवसांत उलटफेर होणार, महापौरपदाच्या वादादरम्यान बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Mumbai : भाजप मुंबईत महापौरपदावर ठाम, शिंदेसेनेला घाम? आता उपमुख्यमंत्री शिंदेंची नवी रणनीती काय? VIDEO

Election Update: निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?

Wednesday Horoscope : तुमच्या संपत्तीत वाढ होणार, दिवस चांगला जणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT