रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असेल. माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान दुरुस्तीची कामे होणार आहेत. या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द, तर काही जलद मार्गावर धावतील.
मुख्य मार्ग माटुंगा ते मुलुंडदरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी येथे येणाऱ्या व तेथून सुटणाऱ्या अप व डाऊन लोकलही सुमारे १५ मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्ग पनवेल ते वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान, पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत सुटणाऱ्या अप हार्बर लोकल, तर सीएसएमटी ते बेलापूर-पनवेलच्या दिशेने सकाळी १ ते दुपारी ३ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन हार्बर लोकल रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर पनवेलहून ठाण्याच्या दिशेने सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर लोकल, तर ठाण्याहून पनवेलच्या दिशेने सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील. प्रवाशांनी ब्लॉक लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. असे आवाहन करण्यात आले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.