Central Railway News SAAM TV
Video

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. दुरूस्तीचे काम सुरू आहे.

Priya More

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. भायखळा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या बिघाडामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल सेवा उशिराने धावत आहेत. ज्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कामाला निघालेल्या प्रवाशांना लोकल उशिराने धावत असल्यामुळे फटका बसला आहे.

लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे आजही कर्मचाऱ्यांना लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असले तरी वाहतूक पूर्ववत होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम झाला असून विविध स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. गर्दी असल्यामुळे अनेकांना लोकलमध्ये चढता येत नाही तर काही जण लोकलच्या दाराजवळ उभं राहून प्रवास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT