Ro-Ro Seva Saam TV
Video

Ganesh Festival : मुंबई ते कोकण जलमार्गे, गणपतीसाठी रो-रो सेवा? नितेश राणेची मोठी घोषणा | VIDEO

Ro-Ro Ferry : यंदाच्या गणेशोत्सवाकरिता मुंबई ते रत्नागिरी दरम्यान रो-रो सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याची माहिती राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जलमार्गे प्रवास करण्याची शक्यता आहे. सर्व नियोजन वेळेत आणि यशस्वीपणे पार पडल्यास मुंबई ते रत्नागिरी दरम्यान रो-रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे महामार्गांवरील वाहतूक कोंडी आणि प्रवासातील वेळ यामुळे नागरिक त्रस्त होतात. अशावेळी जलमार्ग हा एक पर्यायी आणि सुलभ मार्ग ठरू शकतो.

नितेश राणे यांनी सांगितले की, “रो-रो सेवा सुरू करण्यासाठी अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू असून, गणेशोत्सवाच्या आधी ही सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”या सेवेमुळे मुंबईकरांना गर्दीपासून मुक्त आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रो-रो सेवेअंतर्गत प्रवासी वाहने आणि कारदेखील बोटीवरून कोकणात पोहोचू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: माणूस न खाता-पिता किती दिवस जिवंत राहू शकतो?

ChatGpt Down : चॅटजीपीटी बंद! जगभरात कामकाज ठप्प, सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Nashik Crime : मैत्रिणीची छेड काढल्याचा संशय; भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून केली हत्या

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ६८० बोगस शिक्षकांवर गणेश विसर्जनानंतर कारवाई, फोटोही झाले व्हायरल|VIDEO

OBC Reservation : मोठी बातमी! ओबीसी समाजासाठी उपसमितीची स्थापना; यादीत कोणत्या मंत्र्यांची वर्णी, वाचा

SCROLL FOR NEXT