मुंबईकरांनो, पुढील २४ तास मुंबईसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी आणि गरज असल्यासच घराबाहेर पडावं, अन्यथा घरातच सुरक्षित राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
शहरातील अनेक भागांत आधीच पाणी साचण्याच्या घटना घडत असून, सखल भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ शकते, रेल्वे आणि बससेवांवरही परिणाम होण्याची चिन्हं आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याची, वाहतूक खोळंबण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. दादर, परळ, माटुंगा आणि वरळीत जोरदार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी सरकारी सूचनांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.