Mumbra Local Derail Saam Tv
Video

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

Harbour Line Train Delay: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असूव वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Priya More

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. गेल्या २ तासांपासून या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. सिवूड्स आणि जुईनगर रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. हा बिघाड दुरुस्त करण्याचे २ तासांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर ९.५३ वाजता ओव्हर हेड वायरमधील बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर हळूहळू हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पनवेलवरून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल २ तासांपासून बंद होत्या. सध्या सीएसएमटी ते वाशी आणि वाशी ते सीएसएमटी या लोकलसेवा सुरू आहेत. पनवेल ते बेलापूरदरम्यान अप लाईन सुरू असून त्यापुढे लोकल धावत नव्हत्या. मात्र वाशीहून पनवेलला जाणाऱ्या लोकल देखील अनेक स्थानकात रखडल्या होत्या. आता तांत्रिक बिघाड दुरूस्त झाला असून लोकलसेवा देखील पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT