mumbai news Saam tv
Video

मुंबईच्या वांद्रे भागात संघर्ष पेटला; अतिक्रमण कारवाईविरोधात स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक

mumbai bandra news : मुंबईच्या वांद्रे भागात पोलीस आणि प्रशासनाच्या विरोधात संघर्ष पेटला आहे. अतिक्रमण कारवाईविरोधात स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक केली आहे.

Vishal Gangurde

मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशनजवळील गरीबनगर भागात रेल्वेकडून अतिक्रमण हटवा मोहीम सुरू आहे. या भागात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने ही कारवाई केली. परंतु या अतिक्रमण कारवाईला स्थानिकांकडून मोठा विरोध होताना दिसत आहे. कारवाई विरोधात स्थानिकांनी पोलिसांवर बाटल्या, दगडफेक केली. या दगडफेकीनंतर पोलिसांनी त्यांच्यावर सोम्य लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यावेळी काही आंगोलकांनाही ताब्यात घेतलं आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने उभारलेली अनधिकृत घरे,पत्र्याच्या झोपड्या आणि काही व्यावसायिक गाळे हटवण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने कारवाई केली. रेल्वे प्रशासनाच्या कारवाई विरोधात स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आरपीएफ आणि जीआरपीने एकत्रितपणे कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपर फुटी रोखण्यासाठी सरकार संसदेत मांडणार नवीन कठोर कायदा

Water Bottle Smell : रोज धुवूनही पाण्याच्या बाटलीतून दुर्गंधी येते? 'ही' सवय बदलली तर समस्या दूर होईल

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पक्ष्यांचा किलबिलाट! वीकेंडला पुण्यात असाल तर 'या' निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या

उद्धव ठाकरेंना हादरा! ३ जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश, पाहा कोणा-कोणाचा समावेश?

Yuyutsu Mahabharata: युयुत्सु कोण होता? कौरव असूनही पांडवांच्या बाजूने का लढला?

SCROLL FOR NEXT