Mumbai Airport Receives Bomb Threat Saam Tv
Video

Mumbai Airport: दर अर्ध्या तासाला एक-एक विमान उडवून देऊ..., मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल

Mumbai Airport Receives Bomb Threat: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल आला आहे. दर अर्ध्या तासाला एक-एक विमान उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Priya More

मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला धमकीचा ईमेल आला आहे. विमानतळावरील विमानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर हा धमकीचा ईमेल आला आहे. ही धमकी येताच विमानतळावर एकच खळबळ उडाली. पोलिस यंत्रणा आणि विमानतळ सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. धमकीच्या ईमेलमध्ये दर अर्ध्या तासाला विमान उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. जपान, कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानात स्फोटकं असल्याचे ईमेलमध्ये लिहिले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने १० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मागणी करण्यात आली आहे. हा ईमेल कुणी पाठवला आणि कुठून आला आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT