Pakistani Spy Mohammad Tarif Arrested X
Video

Jyoti Malhotra नंतर आणखी एका गद्दाराला अटक; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची दिली कबुली, मोहम्मद तारिफ नेमका आहे तरी कोण?

Pakistani Spy : पाकिस्तानसाठी भारतामध्ये हेरगिरी केल्याचा आरोपाच्या अंतर्गत मोहम्मद तारिफ याने हरियाणाच्या नूहमधून अटक करण्यात आली आहे. तारिफने हेरगिरी केल्याचा कबुली दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Yash Shirke

ज्योती मल्होत्रानंतर पोलिसांनी हरियाणातून आणखी एका व्यक्तीला हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मोहम्मद तारिफ असे त्याचे नाव असून त्याने पाकिस्तानसाठी भारताशी गद्दारी केल्याची कबुली दिली आहे. हरियाणाच्या नूहमधून तारिफला अटक झाली आहे. हवाई दलाशी संबंधित माहिती पाकिस्तानशी शेअर केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी तारिफ त्याच्या वडिलांसह पाकिस्तानला गेला होता.

'आता फक्त सिम कार्ड देऊन चालणार नाही. आता तुला काहीतरी मोठं काम करायचे आहे. मला हवाई दलाच्या सिरसा या तळावर देखरेख ठेवण्याची आणि तेथील गोपनीय माहिती पुरवण्याची जबाबदारी दिली. गेल्या दीड वर्षात मी जाफरला बरीच माहिती दिली. व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ही माहिती पाठवली. या कामासाठी लाखो रुपये देण्याचे आश्वासन मला देण्यात आले होते', असे मोहम्मद तारिफने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

SCROLL FOR NEXT