बीडचे मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खासदारावर गंभीर आरोप केले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी गंभीर आरोप केलाय. बजरंग सोनवणे हे भाजपला मॅनेज आहेत, सोनवणे यांनी मॅनेज होऊन केज मतदार संघासह जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघावर उमेदवार दिले आहेत. असा गंभीर आरोप सुमंत धस यांनी केला आहे.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे केज मतदारसंघाचे उमेदवार रमेश गालफाडे यांचे चिन्ह असलेले इंजिन केज मतदार संघातून धावणारच आहे. जनतेला वेड्यात काढायचं काम या दोघांनी केले. त्यामुळे येणाऱ्या काळात केज मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुलाल उधळेल, असा विश्वास देखील यावेळी मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांच्यासह सुमंत धस यांनी व्यक्त केला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.