VIDEO : मतदानाच्या दिवशी पोलिसांकडून उमेदवाराच्या हातात बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?
ऐरोली विधानसभेतील स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज दुपारी कोपरखैरणे येथे झालेल्या राड्यानंतर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अंकुश कदम यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आचारसंहिता भंग करत मारहाण शिवीगाळ करत शांतता भंग केल्याप्रकरणी अंकुश कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया संपण्याच्या 2 तास आधीच कदम यांना पोलिसांनी अटक केली होती. तर या कारवाई नंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने हा रडीचा डाव खेळत असल्याचा स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.