Mumbai News Saam Tv
Video

Mumbai News: ठाकरे बंधूबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसे-ठाकरेसेनेचे कार्यकर्त्यांकडून तरुणाला अर्धनग्न करत मारहाण; VIDEO व्हायरल

MNS and Shiv Sena Workers Beat Youth: नालासोपाऱ्यात एका तरुणाला मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत त्याने आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

Priya More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट करणाऱ्या तरुणाला मनसे आणि ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला. या तरुणाला मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. सूरज राजेशिर्के असे या तरुणाचे नाव असून त्याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ठाकरे बंधूंवर टीका केली होती.

इन्स्टाग्राम शिवसेना आणि मनसेबाबत वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर सूरज गायब झाला होता. अखेर मनसे आणि ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढले. गुरूवारी रात्री नालासोपारा परिसरातून सूरजला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला कपडे काढून अर्धनग्न करत भररस्त्यात बेदम मारहाण केली. त्यानंतर विवस्त्र अवस्थेत त्याची धिंड काढल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्याचा फटका; छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे छप्पर कोसळले, मोठी दुर्घटना टळली

हार्ट अटॅकचा धोका होईल कमी! हृदय निरोगी ठेवण्यासाठी आजच बदला 'या' ५ वाईट सवयी

Vasai-Virar: मोठी कारवाई! महिला महसूल अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

१००० अनधिकृत चाळी, ६००कोटींची उलाढाल; चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

काय वेळ आलीय! पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त, कॅनमध्ये डिझेल देण्यास आजपासून बंदी, VIDEO

SCROLL FOR NEXT