Jay Malokar Murder Case SaamTv
Video

Jay Malokar Murder Case : जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण

Akola News : मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटूंबियांनी केली आहे.

Saam Tv

मनसे कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता जयचा शवविच्छेदन अहवाल आला असून यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. मिटकरींसोबत झालेल्या राड्याच्या ताणातूनच जय यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे. त्यामुळे राडा झाल्यानंतर तीन तासांत जयसोबत नेमकं काय झालं होतं याची चौकशी करण्याची मागणी जयच्या कुटूंबियांनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची कुटूंबियांची राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यामधील मनसे कार्यकर्ते जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात उघड झालं आहे. जयला जबर मारहाण झाली होती. त्याच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाणीच्या खुना होत्या. छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत. डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज होती. त्यामुळे मेंदूचं वजन वाढलं. मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा झाली आणि या सर्व गोष्टींमुळे 'न्यूरोजनिक शॉक'मुळे जयचा मृत्यू झाला अशी धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

अजित पवार गटात नाराजीनाट्य आहे? कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी थेटच सांगितलं

Rangoli Designs For Diwali: दिवाळीला घराच्या दाराभोवती काढा 5 सोप्या रांगोळ्या, घराची शोभा वाढेल

SCROLL FOR NEXT