Suresh Dhas News SaamTv
Video

Suresh Dhas News : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुरेश धस यांची मोठी प्रतिक्रिया, केलं 'हे' महत्वाचं विधान | VIDEO

Santosh Deshmukh Death Case : मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निवेदन सादर केलं आहे. आमदार सुरेश धस यांनी याबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

Saam Tv

बीड प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले ते अतिशय चांगलं त्यांनी उत्तर दिलं आहे. आमचं समाधान झालं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. बीडमधील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज निवेदन देत या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली आहे. तसंच जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यांनंतर आमदार सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

पुढे बोलताना धस म्हणाले की, ज्यांचा कोणाचा हात आहे, त्या सगळ्यांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात येइल, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसंच सरपंच संतोष देशमूख यांच्या परिवाराला १० लाखाची मदत जाहिर केली आहे. भुमाफिया-वाळूमाफीया, धमकी खंडणी या सगळ्यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, यावर आमचं समाधान झालं आहे. आकाने कोणा कोणावर अन्याय केला आहे. जमिनी बळकावल्या आहेत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करायला पुढे याव, असं माझं बीड जिल्ह्यातील जनतेला सांगण आहे. वाल्मिक कराडवर आतापर्यंत केवळ खंडणीचा गुन्हा आहे. पण चौकशीत काही समोर आले, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. याच्यात आका असेल तर आका पण येईल आणि आकाचा आका पण येईल, असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यावेळी बोलताना म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT