Sunil Prabhu News SaamTv
Video

Sunil Prabhu News : कल्याण घटनेचे पडसाद विधानसभेत; सुनील प्रभूंनी उपस्थित केले प्रश्न|Marathi News

Kalyan Incident News Update : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत कल्याण येथील मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून आक्रमक भूमिका घेत प्रश्न उपस्थित केले.

Saam Tv

मराठी माणसाला मारहाण कशी झाली? असा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केला आहे. या माणसाला लाल दिव्याची गाडी कशी मिळाली? असंही सवाल प्रभू यांनी केला आहे. त्यावर उत्तर देत संबंधित माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई करू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

कल्याण येथे काल एका मराठी कुटुंबाला त्यांच्याच सोसायटीत परप्रांतीयाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवर विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कल्याणमधील या घटनेवरून शुक्रवारी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. याविषयी सभागृहात बोलण्याची परवानगी काँग्रेसने मागितली होती. परंतु परवानगी नाकारण्यात आल्याने विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सभागृहात प्रश्न विचारला. या घटनेतील शुल्का नावाच्या व्यक्तीला लाल दिव्याची गाडी कशी मिळाली? त्यावर मराठी माणसाला मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT