Babanrav Shinde SaamTv
Video

MLA Babanrao Shinde : मोहिते - शिंदे यांच्यातला पंधरा वर्षांचा वाद मिटणार ?

Maharashtra Politics : आमदार शिंदेंच्या 'त्या' सूचक वक्तव्याने चर्चेला उधाण आलं असून आमदार बबनराव शिंदे उद्या पुन्हा शरद पवार आणि जयंत पाटील यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत.

Saam Tv

आमदार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर मोहिते आणि शिंदे यांच्यातील गेल्या पंधरा वर्षानंतरचा राजकीय संघर्ष मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माढ्याची उमेदवारी 'तुतारी'कडून मिळवण्यासाठी प्रसंगी मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेऊ, असे सूचक वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी केल्याने आता त्यांच्यातील वाद मिटणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, 24 ऑक्टोबर रोजी रणजीत शिंदे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे आमदार बबन शिंदे यांनी सांगितलं आहे.

आमदार बबनराव शिंदे उद्या पुन्हा शरद पवार आणि जयंत पाटील यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना उमेदवारी मिळाली, तर राजकीय विरोधक मोहिते पाटील कुटुंबाशी जुळवून सोलापूर जिल्ह्यात काम करू, असे वक्तव्य केलं आहे. आम्हाला तुमच्या पक्षाकडून उभ रहायचं आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांसोबत गेलो होतो. या निवडणुकीमध्ये महायुतीकडून निवडणूक न लढवता शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा विचार केला आहे. शरद पवारांनी उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर माझा मुलगा रणजीतसिंह शिंदे हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असेल, असेही आमदार शिंदे यांनी आज स्पष्ट केले. मोहिते-शिंदे यांच्यातील पंधरा वर्षाचा राजकीय वाद मिटणार? आमदार शिंदेंच्या 'त्या' सूचक वक्तव्याने चर्चेला उधाण आमदार बबनराव शिंदे उद्या पुन्हा शरद पवार आणि जयंत पाटील यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

SCROLL FOR NEXT