Minister Bharat Gogawale Expressing His Anger Over Name Omission in Roha Municipal Event Saam Tv
Video

Bharat Gogawale: मंत्री भरत गोगावले रोहा पालिका मुख्यधिकाऱ्यांवर हक्कभंग आणणार, काय आहे संपूर्ण प्रकरण? VIDEO

Minister Bharat Gogawale Threatens Roha municipal officials: रोहा नगर पालिकेच्या मुख्याधिकारींच्या कार्यक्रम निमंत्रणामध्ये मंत्री भरत गोगावले यांचा नाव टाळल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी हक्कभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

रोहा शहरातील चिंतमण देशमुख सभागृहाचे लोकार्पण वादाच्या भोवऱ्यात सापडले.

निमंत्रण पत्रिकेत मंत्री भरत गोगावले यांचा नाव टाळल्याने नाराजी व्यक्त केली.

गोगावले यांनी मुख्याधिकार्‍यांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हा कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात उभारलेल्या चिंतमण देशमुख सभागृहाचे लोकार्पण वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह आहेत. या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतुन मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळल्याने गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रम पत्रिकेत मंत्री भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळल्या प्रकरणी गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली असून आपण रोहा नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे गोगावले म्हणाले आहेत. हा कार्यक्रम शासकिय असल्याचे सांगताना आम्ही कार्यक्रम करताना सर्वांची नाव टाकतो, या पुढे आम्ही बघू असं देखील गोगावले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

WhatsAppमध्ये आधार कार्ड डाउनलोड करण्याची सोपी ट्रिक

Maharashtra Teachers : शिक्षकांसाठी मोठी बातमी; हजारो शिक्षकांना मिळणार नव्या वेतनश्रेणीचे प्रमाणपत्र

Maharashtra Police: मोठी बातमी ! वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही पोलीस भरतीत संधी, आदेश जारी

SCROLL FOR NEXT