Imtiaz Jalil News SaamTv
Video

Imtiaz Jalil : नांदेडच्या पोटनिवडणुकीतून एमआयएमची माघार; इम्तियाज जलील यांचा मोठा खुलासा

MIM News : एमआयएमचे माजी खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नांदेड पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.

Saam Tv

छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नांदेड पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. एमआयएम नांदेडची पोटनिवडणूक लढणार नसल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यात स्वत: एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आग्रही होते. मात्र आता त्यांनी नांदेडच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली असल्याचं जाहीर केलं आहे. एमआयएम ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. आता आमचं लक्ष हे विधानसभेच्या जागांवर आहे. पूर्ण ताकदीने आम्ही विधानसभा लढवू, असंही त्यांनी म्हंटलं आहे. नांदेडच्या निवडणुकीवरून आम्ही लक्ष काढून घेतलं आहे. विधानसभेला असलेल्या आमच्या १४-१५ जागांवर आता आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे आम्ही आमची सर्व ताकद आता विधानसभा निवडणुकीत लावू, असं यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जलील यांनी म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: साताऱ्यात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Fuel shortage: पेट्रोल-डीझेलच्या किंमतींचा भडका उडणार? केंद्र सरकारचं मोठं विधान, LPG तुडवड्यावरही दिली महत्वाची माहिती

या दोन महिलांना बघितलंत का? १० वर्षांपासून बेकायदा वास्तव्य; ATS ने धाड टाकली अन् खरा चेहरा झाला उघड

Shocking : 'खरात'सारखाच आणखी एक इंजेक्शनवाला बाबा! उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

Summer Eye Care Tips: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT