Manasvi Choudhary
उन्हाळ्यात उष्ण तापमान असल्याने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. उन्हाच्या दिवसात प्रवास करताना डोळ्यांना त्रास होते. डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, कोरडे होणे यासारंख्या समस्या उद्भवतात.
यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय करावे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
सूर्याची अतिनील किरणे डोळ्यांसाठी घातक असतात. बाहेर जाताना नेहमी UV Protection असलेले सनग्लासेस वापरा. यामुळे डोळ्यांचे उन्हापासून संरक्षण होते आणि डोळ्यांवर ताण येत नाही.
उन्हाळ्यात डोळ्यांच्या पूर्ण संरक्षणासाठी Vincent Chase Polarized Sunglasses हा एक उत्तम पर्याय आहे. हे स्टायलिश तर आहेतच, पण सूर्याच्या प्रखर किरणांपासून १००% संरक्षण देतात
दिवसभरातून किमान ३-४ वेळा डोळे थंड पाण्याचे धुवा. यामुळे डोळ्यांतील उष्णता कमी होते आणि धुळीमुळे होणारी जळजळ थांबते.
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे डोळे कोरडे पडू शकतात. डोळ्यांतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी, शहाळे पाणी किंवा ताक प्या.
उन्हाळ्याच्या दिवसात तोंड धुतल्यानंतर स्वच्छ रूमालाचा वापर करा यामुळे डोळ्यात घाण राहणार नाही.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.