MHT CET Saam TV
Video

MHT CET Result : ‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर, 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल|VIDEO

MHT CET Result : ‘एमएचटी सीईटी’ (PCM) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा १९ ते २७ एप्रिल दरम्यान पार पडली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एमएचटी CET ही महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत दरवर्षी घेतली जाणारी एक महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा मुख्यतः अभियांत्रिकी (Engineering), फार्मसी (Pharmacy), कृषी (Agriculture) यांसारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते.

यावर्षीचा राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या ‘एमएचटी सीईटी’ (PCM) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील जवळपास ४,२२,६६३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती. विशेष म्हणजे यामध्ये २२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादक केले आहे. ही परीक्षा १९ ते २७ एप्रिल दरम्यान राज्यातील २०७ आणि राज्याबाहेरील १७ केंद्रांवर पार पडली होती.या परीक्षेच्या आधारे परीक्षेचा अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

Accident : अपघाताचा थरार! भरधाव बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; दोन्ही वाहनांचा चुराडा

Maharashtra Politics: राज ठाकरे मविआत सामिल होणार? मनसेसाठी शरद पवार आग्रही?

SCROLL FOR NEXT