राज्यातील विविध सरकारी आणि निमसरकारी विभागांमधील एकूण १० हजारांहून अधिक अनुकंपा नोकऱ्यांची मेगा भरती मोहीम लवकरच एकाचवेळी पार पडणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या आणि विविध विभागातील लिपिकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून अनुकंपा नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे तब्बल ९ हजार ६५८ उमेदवार नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत.
दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून ही भेट दिली जाणार आहे. अनुकंपा आधारावर भरतीचा अनुशेष भरण्यासाठी सरकारकडून १० हजार अनुकंपा नोकरीसाठी भरती केली जाणार आहे. अनुकंपा नियुक्तीची सर्व रिक्त पदे त्वरित भरण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या भरतीचा प्रश्न सुटणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.