western express highway traffic jam near goregaon saam tv
Video

Mumbai Traffic : मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर प्रचंड ट्रॅफिक जाम; 15-20 मिनिटांच्या प्रवासासाठी दीड-दोन तास

Western Express highway Traffic Jam : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर आज, सोमवारी सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळं पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तास लागत आहेत.

Nandkumar Joshi

संजय गडदे, मुंबई | साम टीव्ही

मुंबईच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर दीड ते दोन तास प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खरं तर सकाळपासूनच या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. पश्चिम द्रुतगती मार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, मालाड, कांदिवली या भागात वाहतूक कोंडी झाली आहे.

विलेपार्ले ते मालाड या १५ ते २० मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तास लागत आहेत. अत्यंत संथगतीने वाहने पुढे जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग; 4 माजी आमदार गळाला

Election Commission: देशातील कोणत्या १२ राज्यात होणार SIR 2.0; कोण-कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Alibaug Tourism : अलिबाग फिरायला गेलाय? मग 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की पाहा

Maharashtra Live News Update: बच्चू कडूंच्या आंदोलनाला शरद पवार गटाचा पाठिंबा

Health Tips: गुळ की मध, आरोग्यासाठी काय फायदेशीर?

SCROLL FOR NEXT