Maratha protesters create ruckus near CSMT as supporters block roads and dance during agitation.  
Video

Maratha Reservation: मराठा बांधवांचा नादखुळा! थेट रस्त्यावर ठेका धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल

Maratha Reservation Protesters Dance Video : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनासाठी हजारो समर्थक जमले आहेत. वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Bharat Jadhav

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आझाद मैदनावर आंदोलन केले जात आहे. मुंबईच्या सर्व रस्त्यांवर भगवं वादळ पाहायला मिळत आहे. शहराच्या प्रत्येक रस्त्यांवर मराठा क्रांती मोर्चाचे हजारो समर्थक दिसत आहेत. मराठा आंदोलक रेल्वेने मुंबईत दाखल होत आहे, मात्र काही आंदोलक रस्त्यावरील वाहतुकीची अडवणूक झालीय. मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना शिस्तेने आंदोलन करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र काही आंदोलक रस्त्यावर वाहने थांबवत नाचत आहेत.

रस्त्याच्या मधोमध वाहनं उभी करून मोठ्या आवाजाच्या स्पीकरवर गाणे लावत नाचत आहेत. हा व्हिडिओ सीएसएमटीच्या चौकातील आहे. मराठा आंदोलकांकडून सीएसएमटी स्थानकावर गाड्यांची अडवणूक केली जात आहे. दरम्यान काल मराठा समाजाचा मोर्चा शुक्रवारी मुंबईत धडकला होता. त्यावेळी आझाद मैदानासह शहराच्या अनेक भागात वाहतूक दक्षिण भागातील प्रमुख रस्ते पूर्णपणे ठप्प झाले. पूर्वमुक्त मार्ग आंदोलकांनी पूर्णपणे रोखून धरला, तर कोस्टल रोडवरही प्रियदर्शिनी पार्क ते नरिमन पॉइंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips : गॅस बर्नर खराब झालाय? फॉलो करा या सोप्या ट्रिक्स

Maratha Protest: साईनगरी शिर्डीतून मराठा आंदोलकांसाठी चटणी-भाकरीची शिदोरी | VIDEO

Aadhaar Card: व्हॉट्सॲपवर आधार कार्ड कसं मिळवाल? जाणून घ्या प्रोसेस

Maratha Reservation : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मराठा बांधवांना 'सरसकट कुणबी' संबोधण्यास नकार

Manoj Jarange Patil Protest Live Updates : नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

SCROLL FOR NEXT