Manasvi Choudhary
ब्रेस्ट कॅन्सर हा आजार गंभीर आहे.महिलांना या आजाराचा धोका जास्त आहे. या आजारांची लक्षणे सुरूवातीला ओळखणे महत्वाचे आहे. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे केवळ स्तनापुरती मर्यादित नसून शरीराच्या इतर भागांतही दिसून येतात.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला दिसल्यास दुर्लक्ष करू नका. वेळीच लक्ष दिल्या वैदयकीय उपचार करणे सोपे होते. ब्रेस्ट कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती आहे ती पाहूया.
कॅन्सरच्या पेशी जेव्हा त्वचेतील लसिकावाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात, तेव्हा स्तनामध्ये अचानक सूज येऊ लागते. कोणत्याही कारणाशिवाय स्तन सुजलेले किंवा नेहमीपेक्षा जड वाटत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्तनाचा आकार अचानक बदलणे, एका बाजूची त्वचा आकसणे, स्तनाजवळील त्वचेचा रंग लाल किंवा गडद होणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.
स्तनाच्या कर्करोगाची सुरुवात अनेकदा काखेत किंवा गळ्याशेजारी भागात गाठ येण्याने होते. या गाठींमध्ये सुरुवातीला अजिबात वेदना होत नाहीत, त्यामुळे महिला त्याकडे दुर्लक्ष करतात.
स्तनाभोवती किंवा निप्पलच्या भागात सतत खाज सुटणे, त्वचा कोरडी पडून पापुद्रे निघणे हा साधा संसर्ग नसू शकतो. हे 'इन्फ्लेमेटरी ब्रेस्ट कॅन्सर'चे सुरुवातीचे संकेत असू शकतात.
कोणतेही मेहनतीचे काम न करता हातांमध्ये तीव्र थकवा जाणवणे, दम लागणे आणि शरीरातील ऊर्जा अचानक कमी झाल्यासारखे वाटणे हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.