पाण्यात फेकला तरी खराब होत नाही! पाण्यामध्ये वॉटरप्रूफ फोन कसं काम करतो?

Manasvi Choudhary

वॉटरप्रूफ फोन

पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वाटते आपल्याकडे वॉटरप्रूफ फोन असावा. वॉटरप्रूफ फोन पाण्यामध्ये टाकली तरीरी खराब होत नाही.

Waterproof Phone

पाण्यामध्ये खराब होत नाही हा फोन

आजकाल अनेक कंपन्या नवनवीन वॉटरप्रूफ फोन लॉन्च करत आहे जे फोन दिर्घकाळ पाण्याखाली राहू शकतात.

Waterproof Phone

पाण्यामध्ये करा फोटो आणि व्हिडीओ शूट

वॉटरप्रूफ फोन हा अन्य स्मार्टफोनपेक्षा वेगळा असतो. वॉटरप्रूफ फोनद्वारे तुम्ही पाण्याखाली फोटो आणि व्हिडीओ देखील क्लिक करू शकता.

How Waterproof Phone Work Under Water

वॉटरप्रूफ फोनचे वैशिष्ट्य

वॉटरप्रूफ फोन हा पाण्यामध्ये ही वापरू शकता हे या फोनचे खास वैशिष्ट्य आहे. या फोनमध्ये पाणी शिरण्यासाठी असलेल्या जागांची संख्या कमी ठेवलेली असते.

Waterproof Phone Important

पाणी शिरण्याच्या जागांची संख्या कमी

वॉटरप्रूफ फोन डिझाईन करताना फोनमधून पाणी आत जाऊ नये म्हणून कमीत कमी जागा किंवा छिद्रे ठेवली जातात.

Minimal Openings | yandex

सिलिकॉन गॅस्केट आणि रबर सिलिंग

फोनचा चार्जिंग पोर्ट, सिम ट्रे आणि बाजूची बटणे या अशा जागा आहेत जिथून पाणी सहज आत जाऊ शकते. हे रोखण्यासाठी कंपन्या या भागांच्या आत 'सिलिकॉन गॅस्केट' आणि 'रबर सिलिंग रिंग्स' चा वापर करतात, जे पाण्याचा थेंब आत जाऊ देत नाहीत.

Rubber & Silicon Seals | Yandex

हायड्रोफोबिक अकूस्टिक मेम्ब्रेन

फोनमध्ये स्पीकर आणि मायक्रोफोनमधून आवाज बाहेर येण्यासाठी बारीक छिद्रे असतात. यामधून पाणी आत जाऊ शकते अशा वेळी पाणी आत जाण्यापासून रोखण्यासाठी यावर 'हायड्रोफोबिक' जाळीदार कापड किंवा मेम्ब्रेन वापरले जाते. हे हवेला आत-बाहेर करू देते, पण पाण्याला पूर्णपणे अडवून धरते.

Hydrophobic Acoustic Membrane | Yandex

नॅनो हायड्रोफोबिक कोटिंग

फोनमध्ये पाणी गेल्यानंतर मदरबोर्ड आणि सर्किट बोर्ड सुरक्षित राहावा म्हणून त्यावर 'नॅनो हायड्रोफोबिक कोटिंग' चा थर दिला जातो. हे कोटिंग वॉटर-रिपेलेंटसारखे काम करते, ज्यामुळे पाण्याचा थेट संपर्क सर्किटशी येत नाही आणि शॉर्ट सर्किट टळते.

Nano-Coating Protection | Yandex

NEXT: तुमच्या पायांमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास समजा काहीतरी गडबड आहे; घरीच करा 'हे' ५ सोपे व्यायाम

Leg
येथे क्लिक करा...