तुमच्या पायांमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास समजा काहीतरी गडबड आहे; घरीच करा 'हे' ५ सोपे व्यायाम

Manasvi Choudhary

पायांच्या समस्या

वाढत्या वयानुसार किंवा दिवसभराच्या थकव्यामुळे अनेकांना पायांच्या वेदना, पायांवर सूज येणे अशा समस्या जाणवू लागतात.

Leg Pain

योगा पोजेस्

पायांमधील वेदना कमी करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी योगासने हा एक सोपा उपाय आहे. नियमितपणे योगासने केल्याने पायांच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो, सांध्यांची लवचिकता वाढते आणि सूज झपाट्याने कमी होते.

Yoga | pinterest

उत्तानासन

पायांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये सतत वेदना होत असतील, तर उत्तानासन करणे अतिशय फायदेशीर आहे. उभे राहून पुढे वाकण्याच्या या योगासनामुळे पाठीचा कणा आणि पायांच्या मागचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे पायांना मजबूतपणा येतो.

Uttanasana - Forward Bend Pose | canva

सेतुबंधासन

सेतुबंधासन योगासनामुळे पायांची हालचाल होते आणि पायांना मजबूतपणा येतो. पाठीवर झोपून या योगा केल्याने मांड्या आणि पायांचे स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे पायांचे दुखणे हळूहळू कमी होते.

Setu Bandhasana - Bridge Pose | Yandex

त्रिकोणासन

पायांना सूज येण्याच्या समस्येवर त्रिकोणासन हा योगा प्रभावी आहे. या योगासनामध्ये पायावर शरीराचा अधिक जोर द्यावा लागतो, ज्यामुळे पायांमधील रक्ताभिसरण सुधारते आणि साचलेले पाणी किंवा सूज नैसर्गिकरित्या ओसरते.

Trikonasana - Triangle Pose | canva

पर्वतासन

पर्वतासन या योगासनामुळे पाय आणि पाठीच्या कण्यासाठी प्रभावी आहे. हे आसन केल्याने पायांच्या स्नायूंना ताकद मिळते आणि पाठीचा कणा देखील ताठ आणि मजबूत होतो.

Parvatasana - Mountain Pose

बालासन

पायांमध्ये अत्यंत तीव्र वेदना होत असतील आणि स्नायूंचा व्यायाम करण्यासाठी तर बालासन करा. या योगासनामुळे पायांच्या आणि पाठीच्या स्नायूंना खोलवर आराम मिळतो आणि थकवा दूर होतो.

Balasana - Child's Pose | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: काचेच्या बांगड्याची फॅशन जुनी झाली, यंदा वटपौर्णिमेला खरेदी करा 'या' ५ नवीन डिझाईन्सच्या हिरव्या बांगड्या

Green Bangles Benefits | yandex
येथे क्लिक करा...