काचेच्या बांगड्याची फॅशन जुनी झाली, यंदा वटपौर्णिमेला खरेदी करा 'या' ५ नवीन डिझाईन्सच्या हिरव्या बांगड्या

Manasvi Choudhary

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा सण अवघ्या काही दिवसांत येऊन ठेपला आहे. हिंदू धर्मात विवाहित महिला हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

Vat Purnima

कधी आहे वटपौर्णिमा

यंदा २९ जून २०२६ रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी महिला खास पारंपारिक लूकमध्ये वडाच्या झाडाची पूजा करतात.

Vat Purnima

हिरवा रंग

हिंदू धर्मात हिरवा रंग हा सौभाग्याचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच, वटपौर्णिमेला हातामध्ये हिरवा चुडा भरण्याची जुनी परंपरा आहे.

Traditional Maharashtrian Chuda

हिरव्या रंगाच्या बांगड्या खरेदी करा

हिरवा रंग हा विवाहित महिलेच्या सौभाग्याचं प्रतीक आहे. वटपौर्णिमेनिमित्त तुम्ही खास हिरव्या रंगाच्या बांगड्या खरेदी करू शकता.

Green Bangles Designs

पारंपरिक काचेच्या हिरव्या बांगड्या

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी अस्सल मराठमोळा लूकसाठी तुम्ही गडद हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या निवडू शकता.

Classic Green Glass Bangles

मॅट हिरव्या बांगड्या

जर तुम्हाला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा आणि रॉयल लुक हवा असेल, तर मॅट फिनिशिंग हिरव्या बांगड्या निवडा. अत्यंत सोबर आणि क्लासिक वाटतात.

Trendy Matte Green Bangles

सोनेरी जरी आणि कुंदन वर्क बांगड्या

काठपदराच्या किंवा पैठणी साडीवर घालण्यासाठी हिरव्या बांगड्यांवर सोन्यासारखे नक्षीकाम केलेले कुंदन कडे तुम्ही निवडू शकता.

Gold Zari & Kundan Work Bangles

हिरव्या रंगाच्या वेलवेट बांगड्या

वेलवेट बांगड्या घालण्याचा सध्या ट्रेंड आहे. तुम्हालादेखील हिरव्या रंगाच्या वेलवेट बांगड्या घालायच्या असतील तर तुम्ही अश्या पद्धतीच्या वेलवेटच्या बांगड्या घाला. या बांगड्या वजनाने हलक्या आणि न टोचणाऱ्या असतात.

Elegant Green Velvet Bangles | google

हिरव्या रंगाच्या ठशाच्या बांगड्या

जर तुम्हाला संपूर्ण चुडा घालायचा नसेल, तर मधोमध काचेच्या बांगड्या आणि पुढे-मागे कोरीव काम असलेल्या जाड 'ठशाच्या हिरव्या बांगड्या' घालू शकता.

Traditional Thasha Bangles

NEXT: पायात काळा धागा बांधून कंटाळलात? मग ट्राय करा 'हे' 5 ट्रेन्डी पैंजण

येथे क्लिक करा...