Manasvi Choudhary
आपल्या हिंदू धर्मात मुली आणि महिला पायात पैंजण घालतात. पैंजणाचा छुमछुम आवाजामुळे घरात सकारात्मकता येते. अनेक शुभ कार्यात महिला व मुली पायात पैंजण घालतात.
मात्र बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार मुली आणि महिला 'लाईटवेट आणि फॅशनेबल पैंजण' घालतात. डेलीवेअरसाठी हे पैंजण अधिक आकर्षक आणि कम्फर्टेबल असतात. तुम्ही देखील हे पैंजण नक्की ट्राय करू शकता.
चांदीच्या पैंजणासोबत तुम्ही काळ्या मण्यांचे, इव्हिल आय डिझाईन्स असणारे पैंजण खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे पैंजण वजनाने हलके आणि डेली वेअरसाठी अत्यंत कम्फर्टेबल असतात.
आजकाल जड, पायात वाजणारे पैंजण मुली घालत नाही त्याऐवजी काळ्या मण्यांमध्ये अनेक डिझाईन्स असलेले नवीन पॅटर्नचे पैंजण मुली निवडतात. वेस्टर्न लूकवर देखील हे पैंजण भारी दिसतात.
पारंपरिककाळ्या मण्यांनी गुंफलेले नाजूक पैंजण खूप लोकप्रिय होत आहे. हे दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक वाटते. हे पैंजण जीन्स, कुर्ती किंवा शॉर्ट वन पीस अशा कोणत्याही वेस्टर्न आऊटफिटवर अगदी उठून दिसते.
जर तुम्हाला साखळीसारखे पैंजण नको असेल, तर तुम्ही एंकलवर फिट बसणारा काळा धागा आणि त्यात गुंफलेले चांदीचे मणी असलेले डिझाईन निवडू शकता
नजर लागू नये म्हणून अनेक जण पायात साधा काळा धागा बांधतात. पण आता याच काळ्या धाग्याला किंवा चांदीच्या नाजूक साखळीला 'इव्हिल आय' लावून फॅशनेबल लूक तुम्ही निवडू शकता.