Manasvi Choudhary
आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी अशा असतात ज्याविषयी आपल्याला माहित नसते.तुमच्या कधी लक्षात आलय का? की तुमच्या फोनमध्ये असणारा सिमकार्डच्या कोपऱ्याला कापलेले का असते?
सिमकार्डची ही फक्त डिझाईन नाही तर यामागेही तांत्रिक कारण दडलं आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
इलेक्ट्रॉनिक भाषेत या डिझाईनला कीइंग म्हणतात. याचा अर्थ एखादे उपकरण किंवा भाग अशा प्रकारे डिझाइन करणे की ते फक्त एकाच प्रकारे बसू शकेल.
सिमकार्डचा एक कोपरा कापलेला असण्यामागचे कारण म्हणजे फोनमध्ये सिमकार्ड व्यवस्थित बसणे.
जर सिमकार्ड सर्व बांजूनी समान असेल तर लोक ते उलट- सुलट कोणत्याही चुकीच्या दिशेने फोनमध्ये बसवायचे यामुळे नेटवर्कमध्ये बिघाड व्हायचा.
सुरूवातीला जेव्हा सिमकार्ड बनवले गेले तेव्हा ते कोपऱ्याला कापलेले नव्हते सिमकार्ड सर्व बाजूंनी अगदी सारखे, म्हणजेच संपूर्ण आयताकृती किंवा चौकोनी असल्याने फोनमध्ये सिमकार्ड टाकताना अडचण यायची आणि ग्राहक ते उलट सुलट कसेही फोनमध्ये बसवायचे त्यामुळे गोंधळ व्हायचा
ग्राहकांची हा गोंधळ लक्षात घेऊन कंपन्यांनी सिमकार्डच्या डिझाईनमध्ये बदल केला. त्यांनी सिमकार्डचा एक कोपरा तिरपा कापण्यास सुरुवात केली. यामुळे मोबाईलच्या स्लॉटमध्ये व्यवस्थित बसतो.