Manasvi Choudhary
नदीच्या काठावरची वाळू तुम्हीही कधी ना कधी पाहिली असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की नदीमध्ये एवढी प्रचंड प्रमाणात वाळू येते कुठून?
नदीत येणारी वाळू ही कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही, तर ती नदीत नैसर्गिकरित्या तयार होते. नदीतील वाळू ही नदीच्या उगमाकडील डोंगराळ आणि पर्वतीय खडकातून येते.
नदीच्या उगमाकडील भागातील मोठ्या खडकांचे रूपांतर जेव्हा बारीक तुकड्यांमध्ये होते तेव्हा वाळू तयार होते या नैसर्गिक प्रक्रियेला झीज असे म्हणतात.
पावसाळ्यात ही वाळू वेगाने तयार होते. वाळूची निर्मिती आणि संचयन ही सतत चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. तेव्हा प्रवाहामध्ये खडकांचे तुकडे वाहून येतात. याला धूपा असे म्हणतात.
नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये दगडाचे तुकडे एकमेकंवर आदळतात आणि घासतात या घर्षणामुळे दगड घासले जातात त्यामुळे वाळूचे कण गोलाकार किंवा अर्ध गोलाकार होतात.
वाळूमध्ये क्वार्टझ खनिज असते जी अतिशय कडक असतात. पाण्यात सहजासहजी विरघळत नाही किंवा त्याचे रासायनिक विघटन होत नाही. त्यामुळे इतर मऊ खडक झिजून पाण्यात वाहून जातात, पण क्वार्टझचे बारीक कण शिल्लक राहतात, ज्याला आपण वाळू म्हणतो.
नदीतील वाळू ही नदीचे पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध करण्याचे आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्याचे काम करते.