Shreya Maskar
पावसाळ्यात तेलकट-तूपकट पदार्थ खाणे टाळा. बाहेरचे समोसे, भजी खाऊ नका. कारण ते पचायला जास्त वेळ घेतात आणि पोटात जास्त वेळ राहतात, ज्यामुळे अतिरिक्त आम्ल तयार होते आणि तीव्र पोटफुगी होते.
जास्त तिखट मिरची असलेले पदार्थ खाऊ नका. अन्ननलिकेच्या अस्तराला त्रास होतो, परिणामी ॲसिडीटीचा त्रास होतो.
पावसाळ्यात स्ट्रीट फूड एकदम बंद करा. स्ट्रीट फूडमुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. दूषित हवा, घाणरडे पाणी आणि अस्वच्छता यामुळे पोटात संसर्ग होतो, ज्यामुळे पोट फुगणे आणि अपचन होऊ शकते.
पावसाळ्यात आपण शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी वारंवार कॉफी- चहा पितो, पण हे आरोग्यास घातक आहे. गरमागरम चहा-कॉफीमुळे पोटातील आम्ल वरच्या दिशेने येते.
संत्री, लिंबू आणि द्राक्षफळे ही फळे आम्लयुक्त असतात. यांचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होते.
पालेभाज्या शरीराल फायदेशीर असल्या तरी पावसाळ्यात याचे सेवन करणे टाळा. पालेभाज्या आणि कच्च्या भाज्या खाल्ल्यास पोटाचे विकार होऊ शकतात.
पावसाळ्यात आधीच कापून ठेवलेले फळे खाऊ नये. तसेच पॅक फूड देखील खाणे टाळावे. पावसाळ्यात अति थंड पेय किंवा पदार्थ खाऊ नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.