Maratha Reservation Saam Tv
Video

Maratha Reservation: मराठा आंदोलन मुंबईत धडकणार, सोलापुरातून २५ हजार वाहनं येणार

Manoj Jarange Rally: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आंदोलन करणार आहेत. यावेळी ते मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे. या आंदोलनासाठी ठिकठिकाणी बैठका सुरू झाल्या आहेत. सोलापुरमधील मराठा आंदोलक २५ हजार वाहनं घेऊन मुंबईत येणार आहेत.

Priya More

आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाची तयारीसाठी आज मराठा समाज बांधवांची पंढरपुरात बैठक झाली. पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातून सुमारे दीड हजार गाड्या मुंबईला जाणार आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक २५ हजार गाड्या मुंबईला जाणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबईला जाण्यापूर्वी बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची मांजरसुंब येथे अंतिम निर्णायक सभा होणार आहे. मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी २९ तारखेला मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आहेत. मुंबईत येण्यापूर्वी बीडच्या मांजरसुंबा परिसरात आज मनोज जरांगे पाटील यांची अंतिम निर्णायक इशारा बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीतून मनोज जरांगे राज्य सरकारला अंतिम इशारा देणार आहेत.ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia Ukraine : युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियावर हल्ला, ड्रोन हल्ल्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान

Thackeray Brothers: मतचोरीविरोधात ठाकरे बंधू मैदानात, कार्यकर्त्यांना मतदार याद्या तपासण्याचे आदेश

Jalgaon News: जळगावात ६४ विद्यार्थ्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स बंद; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: नालासोपाऱ्यात विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचे गैरवर्तन

Gautam Gaikwad Sinhgad : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर सापडला

SCROLL FOR NEXT