Manoj Jarange SaamTv
Video

VIDEO : मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल; विधानसभा निकालावर मनोज जरांगेंचा टोला

Manoj Jarange PC News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर महाविकास आघाडीचा अत्यंत दारुण पराभव झाला आहे. यात मनोज जरांगे यांची जादू संपली असल्याचं बोललं जात आहे. त्यावर आज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

मनोज जरांगे म्हणाले, मी सरकारला सांगतो, तुम्ही मराठा आरक्षण तातडीने द्या, नसता मराठे पुन्हा छातडावर बसणार आहेत. आमच्यासोबत बेईमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणार आहे तुमचे सरकार बसले की लगेच उपोषणाची तारीख ठरवून डिक्लेर करणार आहेत, असा मराठा आंदोलक इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय..., याचं आम्हाला काही सोयरं सुतकच नाही, अशी प्रतिक्रिया निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगेंचा परिणाम फेल झाला असल्याच्या चर्चा सुरू आहेत, यावर जरांगे यांनी दिली.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत अनपेक्षित आला असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महायुती सरकारने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर महाविकास आघाडीचा अत्यंत दारुण असा पराभव या निवडणुकीत पाहायला मिळाला आहे. यात जरांगे यांचा फॅक्टर फेल गेला अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, एखाद्या गोष्टीचं श्रेय कधी घ्यावं तर मोठ- मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावं. हा आमच्यामुळे आला आणि तो आमच्यामुळे आला. जेवढे लोक निवडून आलेत त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे, एखाद्या आमदाराने म्हणावे की तो मराठ्यांच्या जिवावर निवडून आला नाही. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची हयात जाईल, तरी तुम्हाला कळणार नाही, असं म्हणत तुम्ही मराठ्यांच्या नादी कशाला लागता, असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित केला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2025 Mega Auction Live: 'इंडियन' प्रीमियर लीग! 7 भारतीय खेळाडूंवर लागली 126 कोटींची बोली

Arjun Khotkar News : लोकांसाठी सर्वोत्तम काम करणार, खोतकरांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Updates: INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक

Hill Stations:नोव्हेंबर महिन्यात हिल स्टेशनला जायचयं? तर 'या' ठिकाणाला नक्की भेट द्या

Konkan Travel : कोकणचे वैभव असलेल्या 'या' राजवाड्याला कधी भेट दिलीय का?

SCROLL FOR NEXT