Nashik Maratha Protest | नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांची कार अडवली.  SAAM TV
Video

VIDEO : नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी नाना पटोलेंची कार अडवली

Nashik Maratha Protest : मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी आज नाशिकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कार अडवली.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घालून जाब विचारणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येणार होती. याआधीही सुप्रिया सुळे यांना घेराव घालून मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. आता नाशिकमध्ये आलेल्या नाना पटोलेंची मराठा आंदोलकांनी कार अडवली. त्यांना मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. नाना पटोलेंनी मराठा आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. मराठा आरक्षणावर विरोधकांची भूमिका काय आहे, हे इथं स्पष्ट करावे. आम्हाला सत्ताधाऱ्यांना यासंदर्भात जाब विचारायचा आहे, असं आंदोलकांनी नाना पटोलेंना सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2026 मध्ये WhatsApp चॅटिंगचा अंदाज बदलणार; जे लिहू त्याचा Sticker बनेल, आताच जाणून घ्या 3 स्मार्ट फीचर्स

मुदत संपली,आता HSRP नंबरप्लेट बसवता येणार का? खर्च किती होणार? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: 'ज्याने मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक, महापाप केलं तो महापौर', देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Latest Toe Ring Designs : महिलांच्या पायातील ट्रेंडिंग ५ जोडवी डिझाईन, पाहा फोटोज

Ladki Bahin Yojana : महापालिकेच्या मतदानाआधी लाडकीच्या खात्यावर ₹३००० येणार, भाजप नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT