Manoj Jarange during his explosive interview warning the government of serious political consequences. Saam Tv
Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, २०२९ मध्ये परिणाम भोगावे लागतील|VIDEO

Maratha Agitation To Hit Delhi: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण, हत्येचा कट, सारथी योजना आणि सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. मागण्या मान्य न झाल्यास २०२९ मध्ये सरकारला परिणाम भोगावे लागतील असा त्यांनी इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 'साम टीव्ही'ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत मराठा समाज आता दिल्लीत धडकणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 'राज्यातला मराठा एकत्र आला, आता देशातला मराठा एकत्र येतोय, असे सांगत त्यांनी हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि दिल्लीतील मराठ्यांना एकत्र आणण्यासाठी अधिवेशन घेणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा आणि अडीच कोटींची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आरोपींना पाठीशी घालत असल्याचा दावाही त्यांनी केला. सारथी योजना आणि मराठा महामंडळाच्या कारभारावरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. मागण्या मान्य न झाल्यास याचे परिणाम २०२९ ला सरकारला भोगावे लागणार असा थेट इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव शहरात धुलीवंदनाच्या सणानिमित्त बाजारपेठ सजली

Pakistan Violence: खामेनींच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचार, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू

धुळवडीसाठी ४ मित्र कारने निघाले, वाटतेच काळाचा घाला; बीडमध्ये भयंकर अपघात

Israel-Iran War: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे पश्चिम आशियात अडकले महाराष्ट्रातील शेकडो पर्यटक; यादी आली समोर, कोण-कोणत्या जिल्ह्यातील आहेत पर्यटक?

इराण-इस्रायलमध्ये युद्ध पेटलं; इकडं ताजमहलवर ड्रोनच्या घिरट्या, देशात खळबळ

SCROLL FOR NEXT