Manoj Jarange warns CM Devendra Fadnavis during Maratha protest in Mumbai – “Shoot me, but I will not step back. Saam Tv
Video

Manoj Jarange: मला गोळ्या घाला, पण मी मागे हटणार नाही!” – मनोज जरांगे यांचा फडणवीसांना इशारा, पाहा EXCLUSIVE मुलाखत|VIDEO

Maratha Agitation Intensifies: मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप करत "मला गोळ्या घाला पण मी मागे हटणार नाही" असा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

मनोज जरांगे यांनी साम टीव्हीशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय. माझे मराठे शांत आहेत. मुंबई शांत आहे. वेगळ्या वळणावर गेले नाही. आमच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्याला हार्ट अटॅक आला. शिवनेरीलाही आमच्या लेकराचा मृत्यू झाला. पण तो खून आहे, फडणवीस यांनी केला. सगळं होईल. मी आणखी संयमी आहे. मराठे संयमी आहेत. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

शिंदे समितीवर चर्चा

समाधान झालेले नाही. चर्चा झाली आहे. वेळ मिळणार नाही हे मी त्यांना सांगितलं आहे.

कुणबीवर बोलताना जरांगे म्हणाले, १३ महिने अभ्यास केला आहे. आता कशाला वेळ हवा आहे. हैदराबाद, सातारा तातडीने हवं आहे. मराठवाड्यातला मराठा सगळा कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्रातही तेच आहे. फडणवीसांच्या डोक्यातला माज जात नाही. सोईसुविधा केल्या नसत्या तर असं घडलं नसतं. आता कुणाच्या तरी आईचं लेकरू गेलं ना. त्याची आई शापशिव्या देईल. हातात परवानगी असूनही देत नाही. मला गोळ्या घातल्या तरी मी जात नाही येथून. मला गोळ्या घाला. सत्ता आहे तर करा.असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली. मराठ्यांना पुढच्या शनिवार-रविवारपर्यंत शांत राहा. मैदानात गाड्या लावा. आझाद मैदानात शांत बसा. आरक्षण घेऊनच जाऊ. नाही तर पुढच्या आठवड्यात कळेल की, महाराष्ट्र झाडून मुंबईत येणार आहे.

आंदोलनाचा शेवट आरक्षण घेऊन होणार. नाही तर याचा शेवट फडणवीस मला गोळ्या घालून करणार. त्या दिवशी मराठे आणि तुम्ही जाणून घ्या, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. मला गोळ्या घालून मारायचं किंवा जेलमध्ये टाकायचा आहे. मला काही भीती वाटत नाही. नाहीतर इकडे आलो नसतो. असेही ते म्हणाले. आमच्याशी इथे जसं मुंबईत वागाल, तर महाराष्ट्राबाहेर त्यांच्या नेत्यांशी आमचे लोक वागतील. मराठ्यांनी शांत राहायचं, संयम ठेवायचा. गाड्या लावायच्या आणि मुंबईत यायचे. शिवीगाळ, दगडफेक, जाळपोळ असलं काही करायचं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ कोणती?

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

Laxman Hake: अंगावर धावून आले आणि मारण्याचा प्रयत्न केला.." पाहा लक्ष्मण हाकेंसोबत नेमकं काय घडलं|VIDEO

Manoj Jarange Patil Protest Live Updates: मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी सुरू

Monday Horoscope : गौरी-गणपतीत उजळणार नशीब, ५ राशींच्या हाती येईल अचानक पैसा

SCROLL FOR NEXT