मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थकांनी आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. १९ सप्टेंबरला आझाद मैदानात आंदोलक पोहोचणार आहेत. शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मिळेल, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
मनोज जरांगेंनी मुंबईला जाण्याची घोषणा केली. त्यानंतर जरांगे समर्थकांनी आझाद मैदानाच्या (Azad Maidan) परवानगीसाठी मुंबई पोलिसांकडे अर्ज केला आहे. १८ ऑगस्ट आणि २७ ऑगस्टला दिलेल्या अर्जातूनच १९ सप्टेंबरच्या आंदोलनासाठी परवानगी मागितल्याचा उल्लेख आहे. जरांगेंच्या आंदोलनासाठी मुंबई महापालिकेकडे सोयी-सुविधांसाठी मंगळवारी अर्ज देण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाने जरांगेंना परवानगी दिल्यानंतर मुंबई पोलीस काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.