Manoj Jarange Patil Vs Laxman Hake  Saam TV
Video

Maratha vs OBC : तुझ्या बापाचं राज्य आहे का? लक्ष्मण हाके कुणावर भडकले? पाहा VIDEO

Satish Daud

जालना : एकीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणात मराठे नको अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी देखील वडीगोद्री येथे उपोषण सुरु केलं आहे. यादरम्यान दोन्ही आंदोलक एकमेकांचा टीकेचा भडिमार करीत आहेत. आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तर लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट केलं आहे. अंतरवाली आणि वडीगोद्री येथे मंत्री छगन भुजबळांची नाटक कंपनी आंदोलन करत असल्याचा चिमटा मनोज जरांगे पाटील यांनी काढला.

याला प्रत्युत्तर देताना आम्ही जर भुजबळांची नाटक कंपनी असेल, तर तुझी कुठली तमाशा कंपनी आहे? असा पलटवार ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला. इतकंच नाही तर जरांगेंची लायकी आहे का? त्याच्या बापाचं राज्य आहे का? अशी घणाघात हाके यांनी केला. एकनाथ शिंदे हे स्वत:ला मराठा समाजाचे मुख्यमंत्री समजतात, अशी टीकाही लक्ष्मण हाके यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Richest Marathi Actress: मराठी चित्रपटातल्या श्रीमंत सिनेतारका; सर्वाधिक मालमत्ता कोणाची?

Ladki Bahin Yojana : सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर

Maharashtra News Live Updates: - इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीमुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प

Bharatshet Gogawale: अखेर भरत गोगावले अध्यक्ष बनले एसटीचे अध्यक्ष, 2 दिवसांच्या नाराजीनंतर स्वीकारला पदभार

Rajgad Fort : इतिहासाची उजळणी करायचीय? फक्त 'या' ठिकाणाला द्या भेट

SCROLL FOR NEXT