Maratha quota leader Manoj Jarange Patil addressing media after court ban on Mumbai protest. Saam Tv
Video

Manoj Jarange Patil: इंग्रजांच्या काळात आंदोलनाला परवानगी, पण फडणवीसांच्या काळात नाही; मनोज जरांगे कडाडले|VIDEO

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २९ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, कोर्टाने मनाई केल्यानंतरही ते आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी न्यायालयीन आदेशानंतरही मुंबईकडे जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला परवानगी देणार म्हणजे देणार, आमचा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

कोर्टाने मनाई केल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, सरकार जर असं करत असेल तर इंग्रजांच्या काळात देखील असं झालेलं नाही. मराठ्यांचा संयम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघू नये, नाकारायचे कारण तरी आम्हाला द्या. आम्ही शांततेत मुंबईला येत आहोत, आम्ही मुंबईत जाणार म्हणजे जाणार. जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, उद्या 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ते मुंबईकडे निघणार असून, एकही नियम आम्ही डावलणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. न्यायदेवतेने सांगितले आहे की तुम्ही इथे सामाजिक आंदोलन करू शकता. आमच्या मागण्या रास्त आहेत, खऱ्या आहेत. मात्र त्यांना जीवावर आलेला आहे तरी पण आम्ही मागे हटणार नाही. आमची सुद्धा बाजू 100% न्यायदेवतेला ऐकून घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. मुंबईत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी पुन्हा व्यक्त केला.

29 ऑगस्ट रोजी आम्ही मुंबईला येणार आहोत. उपोषण करणार आहोत. न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही. आमचे वकीलही न्यायालयात दाद मागणार आहेत, असे ते म्हणाले. फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, 100% आम्ही लढणार, फडणवीस साहेब मुंबईला येऊन मी आरक्षण घेणार. उद्या सकाळी दहा वाजता सगळे मराठे मुंबईकडे निघणार आहेत. त्यांना वाटतं मराठ्यांनी दगडफेक-जाळपोळ करायला पाहिजे मात्र ते आम्ही करणार नाही. शेवटी जरांगे पाटील म्हणाले, आझाद मैदानला उपोषण करू नका असं न्यायालय म्हणू शकत नाही. काल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आम्ही कायद्याच्या मार्गानेच लढणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Education Scam: 680 शिक्षकांना अटक होणार? बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले

Donald Trump : ट्रम्प C*#@#a...! अमेरिकन तज्ज्ञाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना दिल्या हिंदीत शिव्या, VIDEO

Manoj Jarange: फडणवीस आडकाठी करत असल्याचा जरांगेंचा आरोप; शिंदे-जरांगे साथ साथ?

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावाच्या दौऱ्यावर

Maratha Reservation: धक्कादायक! जरांगेंच्या आंदोलनापूर्वी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; आरक्षणावरून सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT